धक्कादायक ! वीजेच्या धक्क्याने बाप-लेकाचा मृत्यू 

Untitled.png
Untitled.png
Updated on

लाडसावंगी (औरंगाबाद) : वीजेच्या धक्क्याने बाप-लेकाचा मृत्यू झाला. ही घटना लाडसावंगी (ता.औरंगाबाद) शिवारातील शेतवस्तीवर शुक्रवारी (ता. १४) सकाळी सातच्या सुमारास घडली.

मृतात पिता किसन बालाजी भावले (वय ५७) मुलगा विठ्ठल किसन भावले (वय २६) यांचा समावेश आहे. लाडसावंगी परिसरात मागील तीन दिवसांपासून रोज सकाळी संततधार पाऊस चालू आहे. त्यातच सकाळी घरी पाणी नसल्यामुळे विठ्ठल भावले हा भांडे घेऊन विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेला. 

अर्धा तास झाला तरी मुलगा आला नाही म्हणून त्याला पाहण्यासाठी वडील किसन भावले गेले असता, मुलगा वीजमोटार चालू करण्याच्या खांबाजवळ दिसला. त्याला हात लावताच त्यांनाही विजेचा धक्का लागून त्यांचा मृत्यू झाला. बराच वेळ होऊनही दोघे न आल्याने घरात व शेजारीपाजारी चर्चा झाली.

त्यामुळे सर्वांनी विहिरीकडे धाव घेतली असता त्यांना वीजेच्या धक्क्याने दोघेही तेथे पडून असल्याचे दृष्य दिसले. त्यांना तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्र लाडसावंगी येथे दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी तपासून दोघांनाही मृत घोषित केले.

शवविच्छेदनासाठी त्यांचे मृतदेह शासकीय रुग्णालय, औरंगाबाद येथे पाठविण्यात आले. अचानक पिता-पुत्र देल्याने या कुटूंबियाचा आधार गेला आहे. शासन स्तरावरून तातडीने पंचनामा करून मृतांच्या वारसांना शासनाने योग्य ती मदत करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. 

(संपादन-प्रताप अवचार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Chhatrapati Sambhajinagar
Chhatrapati Sambhajinagar
Wife Victims Pimpal Pournima protest
Chhatrapati Sambhajinagar
Marathi News Esakal
www.esakal.com